Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तामलवाडी मिलन लॉज प्रकरणातील मुख्य आरोपीस जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

तामलवाडी मिलन लॉज प्रकरणातील मुख्य आरोपीस जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

0 7 6 4 8 6

तामलवाडी मिलन लॉज प्रकरणातील मुख्य आरोपीस जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

तुळजापूर : बहुचर्चित तामलवाडी मिलन लॉज प्रकरणातील मुख्य आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्काळ जामीन मंजूर केला आहे. बांगलादेशी महिलांचा समावेश असलेल्या या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
धाराशिव ‘प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिक’ विभागामार्फत तामलवाडी येथील मिलन लॉजवर छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी तरुणी व एक महाराष्ट्रातील तरुणी देहविक्री करत असल्याची माहिती समोर आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईनंतर हॉटेल मालक व भाडेतत्त्वावर लॉज चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पिटा कायदा तसेच भारतीय न्यायसंहितेअंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी काम पाहिले. मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ॲड. साखरे यांनी संबंधित आरोपीने केवळ हॉटेल खरेदीचा करार केला असून इसार रक्कम देऊन दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर प्रकारांची माहिती आरोपीला नसल्याचा दावा करण्यात आला.
बांगलादेशी महिलांबाबत आरोपीचा कोणताही संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे पोलिसांच्या तपासात आढळून आले नसल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने मांडला. “Bail is rule and jail is exceptional” हा कायदेशीर मुद्दा उपस्थित करत आरोपीला केवळ आरोपांच्या आधारे कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश श्री.ठुबे यांनी मुख्य आरोपी यांचा रेग्युलर जामीन मंजूर केला.या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. संकेत गोरे, ॲड. रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे