धाराशिव नगराध्यक्षपदासाठी “ओबीसी महिला” प्रवर्ग निश्चित;कायदेशीर जाण असनाऱ्या ॲड मंजुषा साखरे यांची नगराध्यक्ष पदासाठी शहरात जोरदार चर्चा!
धाराशिवच्या राजकारणात नवा चेहरा, नवे नेतृत्व-अॅड. साखरे यांचे नाव शहरभर गाजतंय !
धाराशिव नगराध्यक्षपदासाठी “ओबीसी महिला” प्रवर्ग निश्चित;कायदेशीर जाण असनाऱ्या ॲड मंजुषा साखरे यांची नगराध्यक्ष पदासाठी शहरात जोरदार चर्चा!
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या राजकारणात अखेर नवचैतन्य फुलले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली असून, धाराशिव नगराध्यक्षपद “इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला” प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या घोषणेनंतर शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक जिल्हा प्रवक्ते विशाल प्रभाकर साखरे यांच्या पत्नी सौ. मंजुषा विशाल साखरे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जोरदारपणे चर्चेत आले आहे.
स्थानिक पातळीवर कायदेशीर जाण, सामाजिक भान आणि शहराच्या विकासाची दूरदृष्टी असलेली ही कायदेपंडित व्यक्तिमत्त्व म्हणून सौ. मंजुषा साखरे यांना ओळखले जाते. नागरिकांशी निगडीत विषयांवर त्यांची अभ्यासपूर्ण मते आणि सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांची प्रतिमा जनतेमध्ये सकारात्मक व लोकाभिमुख नेत्याची बनली आहे.
शहरातील अनेक प्रबुद्ध नागरिक व कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की,“जर ॲड. मंजुषा विशाल साखरे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, तर धाराशिव शहराच्या विकासाला कायदेशीर चौकटीतून दिशा मिळेल आणि शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”
दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रमुख राजकीय पक्षांमध्ये गुप्त हालचालींना वेग आला आहे. आगामी दिवाळीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांनी देखील तयारी सुरू केली आहे.
राजकीय समीकरणे, महिला नेतृत्वाचे प्राबल्य आणि नव्या पिढीचा सहभाग या सर्वांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार आणि प्रतिष्ठेची ठरणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.




