ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूरच्या लढ्याला राज्यस्तरीय मान्यता!;रेल्वे संघर्ष समिती अध्यक्षांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025’

0
6
7
8
4
1
तुळजापूरच्या लढ्याला राज्यस्तरीय मान्यता!;रेल्वे संघर्ष समिती अध्यक्षांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025’
तुळजापूर/पुणे : प्रतिनिधी
धाराशिव (उस्मानाबाद) – तुळजापूर – सोलापूर या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गासाठी तब्बल २००६ पासून २०२५ पर्यंत विविध माध्यमांतून सातत्याने लढा देणाऱ्या तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती तुळजापूर चे अध्यक्ष यांना राज्यस्तरावर भव्य सन्मान मिळाला आहे.”महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” गौरविण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

समितीने दोन दशके उचललेली पावले, दिलेला लोकशाही मार्गाने केलेला संघर्ष, प्रशासन व शासनाला पुन्हा पुन्हा धडक देत केलेले पाठपुरावे – या सर्वांचे दस्तऐवजीकरण फाउंडेशनकडे जमा झाल्याने त्यांची निवड सन्माननीय पाहुणे म्हणून करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल सर्व सदस्यांनी अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तुळजापूर तालुका तसेच धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरडे आहे.
पुरस्कार सोहळा — महत्त्वाच्या तपशील
▪️बुधवार : 10 डिसेंबर 2025
▪️ वेळ : सकाळी 11:45 वाजता
▪️स्थळ : पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, शिवाजीनगर, पुणे
आंदोलनातून उभा राहिलेला हा सन्मान तुळजापूरच्या विकासाची नवी पहाट ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
🔗 लोकेशन लिंक:
https://g.co/kgs/9oAjyQG
कृपया वेळेआधी बबनराव गावडे विकास तांबे रत्नाकर खोले अशोकराव साळुंखे अंबादासराव पोपळे अनिल हंगरगेकर मोहन भोसले सतीश पवार राहुल गवळी खयूम शेख अनमोल साळुंखे गोविंद दिवटे दयानंद पांचाळ कोंडीबा प्रताप लायक सय्यद व सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे.
0
6
7
8
4
1



