ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
विकास कदम-मलबा यांची“अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ” जिल्हा संयोजक पदी निवड
विकास कदम-मलबा यांची“अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ” जिल्हा संयोजक पदी निवड
0
6
7
8
4
1
विकास कदम-मलबा यांची“अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ” जिल्हा संयोजक पदी निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले विकास मलबा – कदम यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठाच्या धाराशिव जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीमध्ये निष्ठावंत, प्रामाणिक आणि कार्यकर्ताभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मलबा हे मागील पंधरा ते वीस वर्षांपासून पक्षात एकनिष्ठपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या दीर्घ कार्यप्रवासात त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी घट्ट संपर्क ठेवत पक्षाचे विचार आणि धोरणे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.

या नियुक्तीमुळे तुळजापूरसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून “भाजपच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यात नवचैतन्य येईल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रदेश सरचिटणीस मा. सुजितसिंह ठाकूर, तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील,प्रदेशाध्यक्ष अतुल भोसले, विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व नितीन काळे यांनी ही निवड केली आणि सहकाऱ्यांनीही मलबा यांच्या या निवडीचे स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वर्षाव होत आहे.
0
6
7
8
4
1



