सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा तुळजापूर विधीज्ञ संघाचा निषेध!
सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा तुळजापूर विधीज्ञ संघाचा निषेध!
सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा तुळजापूर विधीज्ञ संघाचा निषेध!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातच, सुनावणी सुरू असताना करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा तुळजापूर विधीज्ञ संघाने तीव्र शब्दात जाहीर निषेध नोंदवला आहे.
विधीज्ञ संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब घोडके यांनी बोलताना सांगितलेआहे की, “देशातील न्यायसंस्थेचा सन्मान व प्रतिष्ठा अबाधित राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च संस्थेत सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे.”या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत असून, हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तुळजापूर विधीज्ञ संघाकडून करण्यात आली आहे.या निषेधात तुळजापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष, ॲड. दत्तात्रय घोडके, सचिव नीलकंठ वाट्टे तसेच सर्व सदस्यांनी सहभागी होते लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.