Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव : आचारसंहितेचा भंग करून मतदारांची दिशाभूल – “धाराशिव 2.0” विरुद्ध गुन्हा दाखल;निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या आदेशानुसार कारवाई

0 7 6 4 8 6

धाराशिव : आचारसंहितेचा भंग करून मतदारांची दिशाभूल – “धाराशिव 2.0” विरुद्ध गुन्हा दाखल;निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या आदेशानुसार कारवाई

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा उघडपणे भंग करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘धाराशिव 2.0’ या सोशल मीडिया हँडलविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट (फेक) एक्झिट पोल व्हिडिओ प्रसारित करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर नोंद निवडणूक आयोगाने घेतली.

निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या निर्देशानुसार आणि तातडीच्या कार्यवाहीची गरज ओळखून ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असल्याने ३० नोव्हेंबरपासून सायलंट पिरीयड लागू होता. आयोगाच्या नियमानुसार मतदानापूर्वीच्या ४८ तासांत कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल प्रसिद्ध करणे प्रतिबंधित आहे. मात्र ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता “धाराशिव 2.0″वरून एका बनावट टीव्ही चॅनेलच्या साचा वापरून भाजप उमेदवार विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे चुकीचे चित्रण करण्यात आले.

या प्रकरणी युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी आणि गोविंद कोळगे यांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार पडताळणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या आदेशानुसार मीडिया सर्व्हेलन्स कक्षाचे सनियंत्रण अधिकारी व उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, ३३७, ३५३ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ (A) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

निवडणूक प्रक्रियेवर कुठलाही गैरप्रकार किंवा दिशाभूलकारी प्रचार सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे