Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापुरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

तुळजापुरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

0 6 7 8 4 1

तुळजापूर : संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१ फेब्रुवारी २०२६ तुळजापूर शहरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. संत शिरोमणी रोहिदास महाराज मंडळ, तुळजापूर यांच्या वतीने शहरात रोहिदास महाराजांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या नंतर विधीवत पूजा व आरती करण्यात येऊन कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले.या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड,धीरज पाटील, माजी नगरसेवक अमर मगर, नगरसेवक अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, नगरसेवक अक्षय परमेश्वर, नगरसेवक आनंद जगताप, चेअरमन विकास गायकवाड, संजय गायकवाड, आप्पा गायकवाड, शहाजी वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी संत रोहिदास महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समतेच्या विचारांची आजच्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह व भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे