अवैध मद्य विरोधी कारवाई : १२ ठिकाणी पोलिसांचा धडक छापा!
अवैध मद्य विरोधी कारवाई : १२ ठिकाणी पोलिसांचा धडक छापा!
अवैध मद्य विरोधी कारवाई : १२ ठिकाणी पोलिसांचा धडक छापा!
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात शनिवार दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अवैध मद्य विरोधी मोठी कारवाई करण्यात आली.या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान १०० लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव, १५८ लिटर गावठी दारू, तसेच देशी-विदेशी मद्याच्या ११३ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.जप्त करण्यात आलेल्या एकूण मद्याची अंदाजे किंमत ३९,७९० इतकी असून, महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत १२ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या अराजक तत्वांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवैध मद्यविरोधी कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



