Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास!

पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास!

0 7 6 4 8 7

पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास!

ढोकी : प्रतिनिधी

ढोकी पे पंप ते गोवर्धनवाडी मार्गावर एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध नागरिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद नेमिनाथ बिडकर (वय ७६ वर्षे, रा. शिराढोण, ता. कळंब, जि. धाराशिव) हे दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.४५ वा. सुमारास ढोकी येथील पे पंप ते गोवर्धनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना, एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगून आयडी कार्ड दाखवले. त्यानंतर त्याने बिडकर यांना गाठून दिशाभूल करीत दोन तोळ्याचे सोन्याचे चैन आणि सुमारे सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातोहात घेत फसवणूक केली.

या घटनेनंतर बिडकर यांनी तात्काळ ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस करत असून, पोलीस असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे पथक सक्रिय झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे