ब्रेकिंगमहाराष्ट्र
पळसवाडीत उबाठा गटाला मोठा धक्का; माजी-विद्यमान पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
पळसवाडीत उबाठा गटाला मोठा धक्का; माजी-विद्यमान पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

0
7
6
4
8
7
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील पळसवाडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून ग्रामपंचायतीतील माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना उबाठा गटाचे माजी उपसरपंच व माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष फुलचंद सिरसट, विद्यमान उपसरपंच संजय गहूदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अविनाश मुळे, कुसुमताई दंडनाईक, श्रीधर लिंबा जाधव, मंजुषाताई रामेश्वर कोळगे व सुजाताताई नंदकिशोर कोळगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पळसवाडीच्या ग्रामराजकारणात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
प्रवेशानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात मनःपूर्वक स्वागत केले. “भाजपा ही विकास, सुशासन आणि सर्वसमावेशक राजकारणाची वाट चालणारी संघटना आहे. पळसवाडीत विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.यावेळी वडगाव (सि) पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार प्रमोद पाटील यांच्यासह खंडेराव चौरे, दिनेश बंडगर, दर्शन कोळगे, दत्तात्रय देशमुख, गफूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पळसवाडी परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.या जाहीर प्रवेशामुळे आगामी पंचायत समिती व ग्रामपंचायत पातळीवरील राजकारणात भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, महायुतीला याचा निश्चितच फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0
7
6
4
8
7





