Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मतिमंद विद्यार्थ्यांसोबत प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस साजरा; सामाजिक उपक्रमातून दिला संवेदनशीलतेचा संदेश

तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

0 7 6 4 8 6

मतिमंद विद्यार्थ्यांसोबत प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस साजरा; सामाजिक उपक्रमातून दिला संवेदनशीलतेचा संदेश

तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

तुळजापूर : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुक्यात एक वेगळा आणि समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. अनावश्यक खर्चाला फाटा देत तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या वतीने धाराशिव येथील स्वाधार मतिमंद शाळेमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाच पक्वान्नांचे भोजन देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले होते. सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाला धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच तुळजापूर उपतालुकाप्रमुख शहाजी हाक्के, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, संजय लोंढे, संभाजी नेपते, बाळू भैय्ये, कुबेर मिटकरी, वाहेद शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांनी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्याची गरज व्यक्त केली. वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव वाढवणारी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे