Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास

गडदेवदरी येथील प्रकार; धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0 6 7 8 4 1

घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास गडदेवदरी येथील प्रकार; धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धाराशिव : तालुक्यातील गडदेवदरी येथे घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओम विजय कांबळे (वय १९, रा. गडदेवदरी ता. जि. धाराशिव) यांची अंदाजे ७० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल (क्र. एमएच-२५ बीजी २४१७) ही त्यांच्या घरासमोर उभी होती. दरम्यान दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजल्यापासून ते दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेल्याचे उघड झाले.याप्रकरणी ओम कांबळे यांनी दि. ४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे