Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवमध्ये अवैध मद्य निर्मितीवर मोठी कारवाई; २ हजार लिटर गावठी दारूचे रसायन जप्त

धाराशिवमध्ये अवैध मद्य निर्मितीवर मोठी कारवाई; २ हजार लिटर गावठी दारूचे रसायन जप्त

0 6 7 8 4 1

धाराशिव |  धाराशिव शहरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवशी दोन ठिकाणी मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २ हजार लिटर गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिल्या कारवाईत रेखा मधुकर काळे (वय ५१), रा. जुना बस डेपो, पारधी पिडी, धाराशिव हिला दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरासमोरून अंदाजे ८४ हजार रुपये किमतीचा १ हजार लिटर रासायनिक द्रव अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत चंपाबाई संजय काळे (वय ४५), रा. जुना बस डेपो, पारधी पिडी, धाराशिव हिच्याकडून सकाळी ७.३० वाजता ८६ हजार रुपये किमतीचा १ हजार लिटर गावठी दारू निर्मितीचा द्रव जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये एस.डी.पी.ओ. कार्यालय धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलांविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५(ई) अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत.शहरात बेकायदेशीर मद्यनिर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे