Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

आई तुळजाभवानीचे दर्शन; अश्विनी देशमुख यांचा मराठा बांधवांकडून सत्कार !

0 7 6 4 9 7

आई तुळजाभवानीचे दर्शन; अश्विनी देशमुख यांचा मराठा बांधवांकडून सत्कार !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मस्साजोगचे सरपंच कै. संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी संतोष देशमुख यांनी दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर सामाजिक सलोखा व श्रद्धेच्या भावनेतून आई तुळजाभवानीची प्रतिमा भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला.हा सत्कार देवीचे पुजारी तथा प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी,कुमार टोले, ओंकार भांगे,मराठा बांधवांचे कट्टर समर्थक तेजस बोबडे यांच्यासह अन्य मराठा बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी कै. संतोष अण्णा देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी आई तुळजाभवानी चरणी देशातील सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे