Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

उमरगा नगरपरिषद निवडणूक काँग्रेसकडून उमेदवारी अर्जांची सुरुवात

0 6 7 8 4 1

उमरगा नगरपरिषद निवडणूक
काँग्रेसकडून उमेदवारी अर्जांची सुरुवात

उमरगा : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. 11 रोजी काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणूक चर्चेला वेग दिला.
उमरगा नगरपरिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे आणि सहायक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे फरहीन खाजा मुजावर आणि सचिन चंद्रपाल सूतके यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करताना तालुकाध्यक्ष अर्जुनजी बिराजदार, शहराध्यक्ष विजयजी दळगडे, जिल्हा सचिव विजय वाघमारे, खाजा मुजावर, अभिमन्यू भोसले, बाबा मस्के यांसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सोमवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मंगळवारी दोन अर्ज दाखल झाल्याने अखेर अर्ज प्रक्रियेला गती मिळाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यात मोठी वाढ होईल असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे