Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नंदगाव गटात शिवसेनेची आघाडी; अमोल जाधव समर्थक अंकुश रुपनुर मैदानात

नंदगाव गटात शिवसेनेची आघाडी; अमोल जाधव समर्थक अंकुश रुपनुर मैदानात

0 7 6 4 8 6

नंदगाव गटात शिवसेनेची आघाडी; अमोल जाधव समर्थक अंकुश रुपनुर मैदानात

तुळजापूर ज्ञानेश्वर गवळी

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाभरातील राजकीय हालचालींना वेग आला असून तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेने आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्वसाधारण पुरुष आरक्षण जाहीर झालेल्या या गटातून शिवसेनेकडून अमोल जाधव यांचे खंदे समर्थक अंकुश अरुण रुपनुर यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.नंदगाव जिल्हा परिषद गटासाठी बोळेगाव येथील सुपुत्र तथा शिवसेनेत सक्रिय असलेले अंकुश रुपनुर हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यांनी गटातील सर्व गावांमध्ये व्यापक जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. मतदारांपर्यंत थेट पोहोचून विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे.
गेल्या काही वर्षांत रुपनुर यांनी गटातील रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या वैयक्तिक समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कामांमुळे त्यांचा नंदगाव गटात मजबूत जनसंपर्क निर्माण झाला असून प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची प्रभावी फळी उभी राहिली आहे.तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा ठाम पाठिंबा, शिवसेनेतील संघटनात्मक अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे अंकुश रुपनुर यांची उमेदवारी अधिक बळकट मानली जात आहे. पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि स्थानिक संघटनेतील सक्रिय सहभागामुळे शिवसेनेत त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना महायुतीत लढणार की स्वतंत्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी नंदगाव गटावर शिवसेनेने ठाम दावा केल्याची चर्चा आहे. रुपनुर यांच्या तयारीमुळे विरोधकांची धावपळ सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.धनुष्यबाण चिन्हाची ओळख, मजबूत जनसंपर्क, स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा आणि विकासकामांचा भक्कम लेखाजोखा या बळावर अंकुश रुपनुर यांनी नंदगाव जिल्हा परिषद गटातून इच्छुकता जाहीर केल्याचे चित्र आहे. आता या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदगाव गटात शिवसेनेच्या हालचाली वाढल्याने येत्या काळात येथील राजकीय समीकरणे अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे