Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती तुळजापूर आरक्षण जाहीर; राजकीय वातावरणात खळबळ

जिल्हा परिषद व पंचायत समिती तुळजापूर आरक्षण जाहीर; राजकीय वातावरणात खळबळ

0 6 7 8 4 1

जिल्हा परिषद व पंचायत समिती तुळजापूर आरक्षण जाहीर; राजकीय वातावरणात खळबळ !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, तब्बल २०२२ पासून सुरु असलेले प्रशासक राज आता संपुष्टात येणार आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून “गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले” अनेक संभाव्य उमेदवार आरक्षणामुळे राजकीय स्पर्धेबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही वर्षांपासून या निवडणुकीसाठी भक्कम तयारी केली असून, आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे.

सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांच्या अंतर्गत बैठकांना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर तक्रारी, नाराजी आणि नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

तालुकानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –

◾सिंदफळ जिल्हा परिषद गट – अनुसूचित जाती (महिला)
A) सिंदफळ पंचायत समिती गण – ओबीसी (महिला)
B) अपसीगा पंचायत समिती गण – अनुसूचित जाती (महिला)

◾काक्रंबा जिल्हा परिषद गट – अनुसूचित जाती (पुरुष)
A) काक्रंबा पंचायत समिती गण – अनुसूचित जाती (पुरुष)
B) सलगरा दि. पंचायत समिती गण – ओबीसी (पुरुष)

◾ मंगरुळ जिल्हा परिषद गट – सामान्य (महिला)
A) मंगरुळ पंचायत समिती गण – सामान्य (महिला)
B) आरळी बु. पंचायत समिती गण – ओबीसी (पुरुष)

◾काटी जिल्हा परिषद गट – ओबीसी (महिला)
A) काटी पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)
B) सावरगाव पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)

◾अणदूर जिल्हा परिषद गट – सामान्य (पुरुष)
A) अणदूर पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)
B) चिवरी पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)

◾काटगाव जिल्हा परिषद गट – ओबीसी (पुरुष)
A) काटगाव पंचायत समिती गण – सामान्य (महिला)
B) तामलवाडी पंचायत समिती गण – सामान्य (महिला)

◾जळकोट जिल्हा परिषद गट – सामान्य (महिला)
A) जळकोट पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)
B) व्होर्टी पंचायत समिती गण – सामान्य (महिला)

◾ शहापूर जिल्हा परिषद गट – अनुसूचित जाती (पुरुष)
A) शहापूर पंचायत समिती गण – ओबीसी (महिला)
B) येवती पंचायत समिती गण – अनुसूचित जाती (महिला)

◾नंदगाव जिल्हा परिषद गट – सामान्य (पुरुष)
A) नंदगाव पंचायत समिती गण – सामान्य (महिला)
B) खुदावाडी पंचायत समिती गण – सामान्य (पुरुष)

आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरणात नवीन रंग चढला आहे. अनेक गट-तटांच्या बैठका, संभाव्य उमेदवारांच्या हालचाली आणि प्रचार नियोजनास आता वेग येणार आहे.
आगामी काही दिवसांत तुळजापूर तालुक्यातील राजकारणात नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे