Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जगदाळे पार्किंगमधील अनधिकृत वसुलीवर शिवसेनेचा आवाज बुलंद; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0 7 6 4 8 6

जगदाळे पार्किंगमधील अनधिकृत वसुलीवर शिवसेनेचा आवाज बुलंद; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील जगदाळे पार्किंग परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत पार्किंग वसुलीविरोधात शिवसेनेने दि.३ डिसेंबर रोजी जोरदार निवेदन सादर केले. तुळजापूर तालुका प्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या अर्जाद्वारे हा मुद्दा तातडीने सोडवण्याची मागणी केली.

अर्जात म्हटले आहे की, संबंधित पार्किंगला नगर परिषदेचा कोणताही अधिकृत परवाना नसताना भाविकांकडून पावत्या देत पैसे वसुल केले जात आहेत. विशेष म्हणजे, त्या जागेचा वाद अद्याप न्यायालयात प्रलंबित असूनही कथितरित्या बेकायदेशीरपणे पार्किंग चालवले जात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

अनधिकृत वसुली करून भाविकांची दिशाभूल करणाऱ्यांवर खंडणीसह कठोर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी जाधव यांनी केली आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आठ दिवसांत पार्किंग बंद न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.भाविकांच्या सुरक्षेचा आणि हक्काचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने या प्रकरणाकडे प्रशासन कोणत्या दिशेने पाऊल उचलते, याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे