Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरातील पोक्सो प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा; २० वर्षांपर्यंत सश्रम कारावास

तुळजापूरातील पोक्सो प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा; २० वर्षांपर्यंत सश्रम कारावास

0 7 6 4 8 6

तुळजापूरातील पोक्सो प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा; २० वर्षांपर्यंत सश्रम कारावास

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर येथील गंभीर लैंगिक अत्याचार व पोक्सो प्रकरणात दि.३० मार्च २०२६ अति सत्र न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. सेशन केस क्रमांक ३२/२०२३ (गु.र.नं. १११/२०२३) या प्रकरणात आरोपी प्रवीण आप्पासाहेब भालेकर (वय ३८,रा. ढेकरी, ता. तुळजापूर,जि.धाराशिव) यास दोषी ठरवत न्यायालयाने विविध कलमांखाली शिक्षा ठोठावली.
अति सत्र न्यायालय क्रमांक ३, धाराशिव येथील मा.न्यायमूर्ती आवटे यांनी दि. ३० मार्च २०२६ निकाल देताना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(३) अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी मुख्य शिक्षा सुनावली. तसेच कलम ३७७ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व २,५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.या शिवाय, कलम ३५४(अ) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास, तसेच पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली (कलम १०, १२, १४, ८) अनुक्रमे ५ वर्षे, ३ वर्षे, ५ वर्षे व ३ वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अंतर्गतही आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली.सर्व शिक्षांसह एकूण १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ व्ही. काशीद यांनी केला होता.सरकारी पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अ‍ॅड.एस.एस.सूर्यवंशी यांनी प्रभावी बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेका १३६० मानाजी पाटोळे यांनी कामकाज पाहिले.या निकालामुळे जिल्ह्यातील पोक्सो प्रकरणांबाबत कठोर संदेश गेला असून,न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे