प्रभाग ९ अंधारातून प्रकाशाकडे;समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध जनसेवक अमोल कुतवळ यांचा पुढाकार !
प्रभाग ९ अंधारातून प्रकाशाकडे;समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध जनसेवक अमोल कुतवळ यांचा पुढाकार !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील प्रभाग क्रमांक ९ परिसरात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून “अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल” घडवून आणणारे नाव म्हणजे जनसेवक अमोल कुतवळ!गेल्या अनेक महिन्यांपासून वडार गल्ली, वासुदेव गल्ली, जिल्हा परिषद शाळा परिसर, १०८ भक्तनिवास व कार पार्किंग परिसरात स्ट्रीट लाईट बंद असल्याने परिसर अक्षरशः अंधारात बुडाला होता. टेंडर दिल्यानंतरही नगरपरिषदेने या भागाकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी, भाविक व स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत होता. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी उचल खाल्ली होती, तसेच महिलांना आणि वृद्धांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.ही परिस्थिती लक्षात घेऊन जनतेचा खरा सेवक अमोल कुतवळ यांनी कोणाची वाट न पाहता स्वखर्चातून प्रभागातील ६० पोलवर नवीन एलईडी स्ट्रीट लाईट बसवून परिसर उजळवला. तसेच तुबलेल्या गटारींची स्वच्छता करून नव्या फरश्या बसविण्याचे कामही पूर्ण केले.या कामामुळे प्रभाग ९ परिसर नव्या उजेडात न्हाऊन निघाला असून, नागरिकांतून अमोल कुतवळ यांच्या कार्याची सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.

◾स्थानिक रहिवासी सांगतात
“अमोल कुतवळ यांनी आमच्या भागात खरं अर्थाने ‘जनसेवा’ दाखवून दिली आहे. अंधार हटवून त्यांनी नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रकाश फुलवला!” प्रभाग ९ मधील प्रत्येक गल्लीप्रमाणेच, नागरिकांच्या मनातही अमोल कुतवळ यांच्यावरील विश्वासाचा दिवा उजळला आहे.



