गुटखा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई;सहा जणांवर गुन्हे दाखल
गुटखा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई;सहा जणांवर गुन्हे दाखल
गुटखा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई;सहा जणांवर गुन्हे दाखल
तुळजापूर : प्रतिनिधी
राज्यात गुटखा,पानमसाला आणि सिगारेट विक्रीवर शासनाने घातलेल्या बंदीनंतरही तुळजापूर तालुक्यातील काही जणांकडून या प्रतिबंधीत पदार्थांची अवैध विक्री सुरु असल्याचे उघड झाले आहे. तामलवाडी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत सलग कारवाई करत एकूण सहा जणांकडून बंदी असलेला गुटखा व पानमसाला जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तामलवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजापूर–सोलापूर मार्गावरील विविध हॉटेल परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संतोष वसंत घोटकर (वय ५०, रा. तामलवाडी) हा आमदार गुळाचा चहा हॉटेलजवळ गुटखा केसरयुक्त विमल पानमसाला किंमत रु३४८ इतका साठा विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याचे पोलिसांना आढळले.
यानंतर संतोष तुकाराम गुंड (वय ३१, रा. देवकुराळी) हा सेवागिरी गुळाचा चहा हॉटेलजवळ रू ४०२ किंमतीचा विमल गुटखा विक्रीसाठी बाळगलेला सापडला. तर विकास महादेव गरड (वय २६, रा. तामलवाडी) हा शंभुराजे हॉटेलजवळ ७२० किंमतीचा आरएमडी गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगलेला आढळला.
तसेच राहुल प्रेमचंद बघेल (वय २१, रा. पुरामनसराम, ता. ईटवा, ह.मु. तामलवाडी) हा शिवनेरी हॉटेलजवळ ४९० किंमतीचा विमल व डायरेक्टर पानमसाला विक्रीसाठी बाळगलेला होता. त्याचबरोबर प्रीतम संदीपान चौधरी (वय 38, रा. तामलवाडी) हा ₹360 किंमतीचा गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगलेला पोलिसांना सापडला. तर प्रविणकुमार लिंबाजी भोसले (वय 30, रा. हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर, ह.मु. टेालनाका, तामलवाडी) हा कोल्हापुरी अमश्ततुल्य हॉटेलजवळ ₹720 किंमतीचा विमल व डायरेक्टर पानमसाला विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे उघड झाले.
या सर्वांकडून गुटखा व पानमसाल्याचा एकूण हजारो रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर संबंधितांवर कलम 6(अ), 24 सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात, प्रतिबंध व व्यापार नियमन अधिनियम 2003 अन्वये सहा स्वतंत्र गुन्हे तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत.
तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या आदेशाने
पोलिस उपनिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.



