ब्रेकिंगमहाराष्ट्र
पूरग्रस्त शेतकऱ्यांना रेशन किटचे वाटप – समाज विकास संस्थेचा उपक्रम
पूरग्रस्त शेतकऱ्यांना रेशन किटचे वाटप - समाज विकास संस्थेचा उपक्रम
0
6
7
8
4
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांना रेशन किटचे वाटप – समाज विकास संस्थेचा उपक्रम
कळंब : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसानीला सामोरे गेलेल्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समाज विकास संस्था, उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोकविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सातेफळ, हळदगाव, सौंदाना परिसरातील ३०० शेतकऱ्यांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी महावीर डोके आणि त्यांचा मित्रमंडळ यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमावेळी भूमिपुत्र वाघ, विद्या ताई वाघ, हरिश्चंद्र ढाकणे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई गुंजाळ, मारुती शिरसाट, मनीषाताई घुले, विकास कुदळे, शीतल गहेरवार, प्राचार्य वेंकट अणिगुंठे व ॲड. दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात समाजातील विविध घटकांनी अशा प्रकारे पुढे येऊन मदतीचा हात दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0
6
7
8
4
1



