Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मुंबईत तुळजापूरच्या दत्तात्रय वाघमोडे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार

मुंबईत तुळजापूरच्या दत्तात्रय वाघमोडे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार

0 6 7 8 4 1

मुंबईत तुळजापूरच्या दत्तात्रय वाघमोडे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

आपल्या कार्यातून समाजाशी, मातीशी आणि माणुसकीशी नातं जपणाऱ्या तुळजापूरच्या सुपुत्राचा मुंबईत सत्कार करण्यात आला. वनमंत्री तथा पालकमंत्री मा.गणेश नाईक यांच्या हस्ते दत्तात्रय वाघमोडे यांचा गौरव करण्यात आला.

वाघमोडे हे तुळजापूर येथील प्रतीक्षा नगर येथी रहिवासी असून गेले पंधरा वर्षांपासून मुंबईतील नामांकित “सुरज हॉस्पिटल”मध्ये कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ.आर्यन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते निष्ठेने सेवा देत आहेत. मराठवाड्यातून उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांना ते नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करतात.आपल्या गावाशी घट्ट नातं टिकवून त्यांनी “सेवा हीच पूजा” हे तत्व आचरणात आणले आहे.

वाघमोडे यांच्या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. संजना वाघमोडे यांचे मोलाचे सहकार्य आहे. मुंबईतील व्यस्त जीवन जगत असताना त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षणाची संधी दिली.गावाशी आपले नातं टिकवण्यासाठी वर्षातून काही दिवस ते तुळजापूरला भेट देतात आणि आपल्या पारिवारिक मित्रमंडळीसोबत जिव्हाळ्याने वेळ घालवतात.

या सन्मान सोहळ्याला श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष विपीन शिंदे, नितीन सूर्यवंशी,सचिन शिंदे, बबलू,अमर गायकवाड,गणेश बागल,किरण जाधव,बिभीषण लाटे,राजकुमार जायभाय,गणेश कांबळे,विद्यासागर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजसेवेबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दत्तात्रय वाघमोडे यांच्या सन्मानाने तुळजापूरवासीयांचा अभिमान अधिक वाढवला आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे