व्यापारी वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भोसले सज्ज; भाजपा तुळजापूर शहराध्यक्ष पदाची सूत्रे हाती !
तुळजापूरात व्यापार आघाडीचा नवा अध्याय; राहुल भोसले यांची शहराध्यक्षपदी निवड
व्यापारी वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भोसले सज्ज; भाजपा तुळजापूर शहराध्यक्ष पदाची सूत्रे हाती !
तुळजापूर : प्रतिनिधी
भाजपाच्या व्यापार आघाडीच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी युवा उद्योजक राहुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेतृत्व विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती पार पडली. या निर्णयाने तुळजापूरातील व्यापारी व युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमी वयात उल्लेखनीय यश मिळवणारे आणि सामाजिक कार्यात सतत अग्रस्थानी राहणारे भोसले यांनी वृक्षारोपण, उन्हाळ्यात पाणपोई उभारणी, तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
या प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितिन काळे, व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोंधले यांनी राहुल भोसले यांना नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले.
भोसले यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी वर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि भाजपा व्यापार आघाडी तुळजापूरात अधिक सक्षम होईल, असा विश्वास तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी व्यक्त केला.
तुळजापूर शहरातील व्यापारी वर्गाचा आवाज ठोसपणे मांडत, नव्या ऊर्जेने आणि समन्वयाच्या भावनेने शहराच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार भोसले यांनी “तुळजापूरनामा न्युज शी” बोलताना व्यक्ती केला.




