Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरच्या बदनामीमागे षडयंत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0 7 6 4 8 7

तुळजापूरच्या बदनामीमागे षडयंत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा तसेच रेल्वे प्रकल्पासाठी शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून, येत्या काळात तुळजापूरचा सर्वांगिण कायापालट होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, या सकारात्मक घडामोडींना विरोध करत काही विरोधकांनी एकत्र येऊन तुळजापूरची बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुळजापूरमधील ड्रग्स प्रकरणासंदर्भात काही माहिती मिळाल्यानंतर ती तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित प्रकरण उघडकीस आणले.

 

तथापि, या प्रकरणाचा आधार घेत काही घटकांकडून जाणीवपूर्वक तुळजापूरची नाहक बदनामी केली जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तुळजापूरच्या मुख्य महंतांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील दाखल केली होती.

दरम्यान, आज विधानसभेत या प्रकरणी लक्षवेधी मांडण्यात आली. तुळजापूरविरोधात षडयंत्र रचून बदनामी केली जात असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे