Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सराफ सुवर्णकार समितीच्या “केंद्र शासन आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आ. कैलास घाडगे -पाटील यांचे कौतुक; संघटनेच्या पारदर्शक कार्यपद्धतीची दखल

सराफ सुवर्णकार समितीच्या “केंद्र शासन आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आ. कैलास घाडगे -पाटील यांचे कौतुक; संघटनेच्या पारदर्शक कार्यपद्धतीची दखल

0 7 6 4 8 6

सराफ सुवर्णकार समितीच्या “केंद्र शासन आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आ. कैलास घाडगे -पाटील यांचे कौतुक; संघटनेच्या पारदर्शक कार्यपद्धतीची दखल

धाराशिव : सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “केंद्र शासन आपल्या दारी” हा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अत्यंत यशस्वी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या निमित्ताने सराफ-सुवर्णकार समाजातील विविध प्रश्न, शासनाच्या योजना तसेच व्यवसायिकांना मिळणाऱ्या सुविधा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाबद्दल आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी समितीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. समितीची संविधानिक व पारदर्शक कार्यपद्धती ही इतर संघटनांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक व्यासपीठावर संघटनेच्या कामाची घेतलेली दखल ही संघटनेच्या कार्यातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि एकजुटीची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णुदासजी सारडा, जिल्हाध्यक्ष कपिल शर्मा आणि शहराध्यक्ष रामदासजी वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अर्चना पांडे, अर्चना भोसले, जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्यासह सराफ-सुवर्णकार व बंगाली कारागीर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात सर्व समाजबांधवांनी दाखविलेली एकजूट आणि शिस्त पाहून उपस्थित पाहुण्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. सराफ-सुवर्णकार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी संघटना भविष्यातही अशाच जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जय नरहरी, जय शिवराय, जय संविधान अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे