शांताई ऍग्रो फार्मातून ५० हजारांचा कॉपर वायर चोरीला
शांताई ऍग्रो फार्मातून ५० हजारांचा कॉपर वायर चोरीला
शांताई ऍग्रो फार्मातून ५० हजारांचा कॉपर वायर चोरीला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ ) शांताई ऍग्रो फार्म येथून तब्बल ५० हजार किंमतीचा इंडस्ट्रियल कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी अमित बाळासाहेब पाटील (वय २६ वर्षे, व्यावसायिक – शांताई ऍग्रो फार्म, देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन धोडींबा गवळी (वय ३५, रा. येवती, ह.मु. बसवंतवाडी) याच्यासह आणखी तिन अनोळखी इसमांनी शांताई ऍग्रो फार्ममधून अंदाजे २५ मीटर लांबीचा, सुमारे ५० हजार किंमतीचा इंडस्ट्रियल कॉपर वायर चोरून नेला.
घटनेनंतर फिर्यादी अमित पाटील यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या नुसार गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.



