Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

१५६ कोटींच्या रस्ते कामांत घोटाळ्याचा आरोप; चौकशीची मागणी

१५६ कोटींच्या रस्ते कामांत घोटाळ्याचा आरोप; चौकशीची मागणी

0 7 6 4 8 6

१५६ कोटींच्या रस्ते कामांत घोटाळ्याचा आरोप; चौकशीची मागणी

तुळजापूर : शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली आहे. याबाबत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांना दि. ३० एप्रिल रोजी लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदना असे नमूद केले आहे की,नगरसेवक अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय कदम (परमेश्वर), सौ. प्रगतीताई लोंढे व ऋषिकेश मगर यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित कामांमध्ये सादर करण्यात आलेली काही कागदपत्रे खोटी व बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः संबंधित ठेकेदाराकडून सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.दरम्यान, शहरातील मोठ्या निधीच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून चौकशी अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे