ब्रेकिंगमहाराष्ट्र
वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम; बालाजी ढोबळे पाटील यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन
शुद्ध पाण्याचे जार व शालेय साहित्य वाटप; "एक पाऊल समाजासाठी"चा प्रेरणादायी संदेश

0
7
6
4
8
6
वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम; बालाजी ढोबळे पाटील यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन
शुद्ध पाण्याचे जार व शालेय साहित्य वाटप; “एक पाऊल समाजासाठी”चा प्रेरणादायी संदेश
तुळजापूर : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव नव्हे, तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काहीतरी विधायक करण्याची संधी असते, हा संदेश देत बालाजी भैरवनाथ ढोबळे – पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जार वाटप आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण अशा उपक्रमांमुळे या वाढदिवसाची जिल्हाभरात चर्चा होत आहे.दि. १२ जून २०२६ रोजी हनुमान मंदिर, उंडरगाव, ता. जि. धाराशिव येथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

“रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.याचबरोबर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय साहित्याचेही वितरण करण्यात येणार आहे.”तुमचे एक रक्तदान कोणाचे तरी जीवन वाचवू शकते. चला, एक पाऊल समाजासाठी उचलूया,” असा भावनिक संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन मुरलीधर गेहदेव मोरे, कृष्णा राम गंगणे, नानासाहेब जगन्नाथ सूर्यवंशी, बालाजी गौतम रचळे, दादासाहेब हरिबा रवळे, हनुमंत रमेश रवळे, अक्षय दिनेश रवळे, कालिदास सुरेश रवळे, राम शिवाजी सूर्यवंशी (चेअरमन) आणि अमित हनुमंत ढोबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ केक कापण्यापेक्षा रक्तदान, पाणीदान आणि ज्ञानदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे बालाजी ढोबळे पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
7
6
4
8
6



