Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

काँग्रेस मीडिया सेलची धुरा विकास तांबे यांच्याकडे? काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अथवा कार्याध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी

काँग्रेस मीडिया सेलची धुरा विकास तांबे यांच्याकडे? काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अथवा कार्याध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी

0 7 6 4 8 6

काँग्रेस मीडिया सेलची धुरा विकास तांबे यांच्याकडे?

काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अथवा कार्याध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी

धाराशिव, : दि. १० जून काँग्रेस पक्षाशी तब्बल चार दशकांहून अधिक काळ एकनिष्ठ राहून काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास विठ्ठलराव तांबे यांचे नाव सध्या जिल्ह्यात काँग्रेसच्या मीडिया सेलच्या नेतृत्वासाठी चर्चेत आले आहे. जिल्हा काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हध्यक्षपद सध्या रिक्त असल्याने अथवा जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी विकास तांबे यांच्याकडे सोपविण्याची मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून होत आहे.१९८३-८४ पासून कट्टर काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या विकास तांबे यांनी पक्ष संघटनाबरोबरच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

ते रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष, डॉ. पद्मसिंह पाटील संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्था, बावी सचिव म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय विविध संस्थांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख असून संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. दि. १० जून रोजी धाराशिव येथील काँग्रेस भवनात होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विकास तांबे यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे.
काँग्रेस मीडिया सेलचे नेतृत्व सक्षम व अनुभवी व्यक्तीकडे दिल्यास पक्षाच्या विचारांचा प्रभावी प्रचार होऊन पक्ष बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे विकास तांबे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याबाबत वरिष्ठ नेतृत्वाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होत आहे.दरम्यान, आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.चार दशकांची निष्ठा, संघटनात्मक अनुभव अन् कार्यकर्त्यांचा पाठिंबा; विकास तांबे यांच्या नावाची जोरदार चर्चा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे