Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांचा जनसागर! दिवाळी सुट्ट्यांमुळे तुळजापूरात अभूतपूर्व गर्दी — तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती

तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांचा जनसागर! दिवाळी सुट्ट्यांमुळे तुळजापूरात अभूतपूर्व गर्दी — तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती

0 7 6 5 0 9

तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांचा जनसागर!

दिवाळी सुट्ट्यांमुळे तुळजापूरात अभूतपूर्व गर्दी — तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा अलोट जनसागर कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात उसळला आहे. शनिवार-रविवार आणि दिवाळीच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्रातील रस्ते अक्षरशः भाविकांनी फुलून गेले आहेत. मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून, भविष्यात या संख्येत आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी शासन स्तरावर सर्वांगीण नियोजन हाती घेण्यात आले आहे.

कुलस्वामिनीच्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरातील सोयीसुविधा, निवास व्यवस्था, दर्शन मंडप, वाहनतळ, वाहतूक नियंत्रण आदी बाबींवर प्रशासन गंभीरपणे विचार करत आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणेच तुळजापूरच्या तीर्थक्षेत्राचा देखील नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातून आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण आणि भाविकांसाठी सुलभ अशी व्यवस्था उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आराखड्यात तज्ञांचा सल्ला, स्थानिक पुजारी बांधव व नागरिकांचा सहभाग यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

या उपक्रमातून तुळजापूर परिसरात केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठा बदल होईल. स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे नवे दरवाजे खुलणार असून, आई तुळजाभवानीच्या कृपेने तीर्थक्षेत्राचा सुवर्णयुग आरंभ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे