देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
अजितकाका गेले, ही जाणीव मन पोखरून टाकणारी – आ.राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

0
7
6
4
8
6
अजितकाका गेले, ही जाणीव मन पोखरून टाकणारी – आ.राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
धाराशिव | प्रतिनिधी
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी अजितकाका यांच्या निधनाबद्दल तीव्र शोकभावना व्यक्त केली. काका म्हणून नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे, कठीण प्रसंगी धीर देणारे आणि खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारीचा खरा अर्थ अजितकाकांनी कृतीतून शिकवला, असे सांगत त्यांनी शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवण्याचा आणि निर्णय घेताना लोकहित केंद्रस्थानी ठेवण्याचा वारसा दिल्याचे नमूद केले. व्यक्तिगत नात्यापलीकडे ते कायम प्रेरणास्थान आणि आदर्श होते, असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता, ही आठवण आजही मन सुन्न करून टाकणारी आहे. अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी कळल्यावर शब्द हरपले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अजूनही त्यांच्या जाण्यावर विश्वास बसत नसल्याचे सांगताना, मनात प्रचंड भावनिक कोलाहल सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या घटनेमुळे केवळ कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे.

शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारे कृतिशील नेतृत्व हरपल्याची पोकळी दीर्घकाळ भरून निघणार नाही,शेवटी, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, अशी भावपूर्ण प्रार्थना करत त्यांनी अजितकाकांना श्रद्धांजली अर्पण केली.

0
7
6
4
8
6



