ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
विनोद गंगणेच पुन्हा ‘आसमान’ गाठणार? नगराध्यक्षपदाची लढत तापली; गंगणे यांचेच परडे जड?
विनोद गंगणेच पुन्हा ‘आसमान’ गाठणार? नगराध्यक्षपदाची लढत तापली; गंगणे यांचेच परडे जड?
0
7
6
4
8
6
विनोद गंगणेच पुन्हा ‘आसमान’ गाठणार?
नगराध्यक्षपदाची लढत तापली; गंगणे यांचेच परडे जड?

तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नगराध्यक्षपदाची थेट दुरंगी लढत उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे पुन्हा एकदा बाजी मारतील, अशी जनमानसात जोरदार कुजबुज सुरू आहे.

गेल्या दीड दशकात नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात गंगणे यांनी शहरात केलेल्या कामांचा ठसा आजही नागरिकांच्या स्मरणात ताजा आहे. जलपुरवठा सुधारणा, रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, स्वच्छता मोहिमा, शहरातील मूलभूत सुविधा उभारणी या कामांमुळे गंगणे यांच्या नावावर “विकास” ही ठळक छाप राहिल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

शहरातील तरुण, महिला आणि व्यावसायिक वर्गाकडून मिळणारा प्रतिसादही गंगणे यांच्या परड्यास बळ देणारा ठरत आहे. “विकासाची गती कायम ठेवायची” या भावनेने भाजपची प्रचारयंत्रणा अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येते.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ठाम समर्थन हे गंगणे यांच्यासाठी महत्त्वाचे शस्त्र मानले जात आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गेल्या काही दिवसांत प्रचाराला वेग आला असून भाजपच्या कार्यालयातही चांगली लगबग पाहायला मिळत आहे.

“१५ वर्षांत तुळजापूरचा चेहरामोहरा बदलला. अजून मोठ्या योजना हाती आहेत. जनता पुन्हा एकदा विश्वास टाकेल,” असा विश्वास विनोद गंगणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी लढत चुरशीची ठेवल्याचे मानले जात असले तरी अनुभव, कामगिरी आणि जनाधार या तिन्ही आघाड्यांवर गंगणे बाजी मारतील, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. ३ नोव्हेंबरला ‘विकासाचा झेंडा’ पुन्हा एकदा फडकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भव्य प्रचार सभा आज
भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची जाहीर सभा आज (दि. २७ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली आहे.
ठिकाण : आर्य चौक, तुळजापूर
वेळ : सायं. ६.३० वा.
पक्ष कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहर शाखेतर्फे करण्यात आले आहे.
0
7
6
4
8
6



