Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरमध्ये NOTA विषयी जनजागृतीची मागणी जागरूक मतदाराची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विनंती

निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन – “NOTA विषयी स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक”

0 7 6 4 8 6

तुळजापूरमध्ये NOTA विषयी जनजागृतीची मागणी
जागरूक मतदाराची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विनंती

निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन – “NOTA विषयी स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक”

तुळजापूर : प्रतिनिधी

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर मतदारांना “NOTA” म्हणजेच वरीलपैकी काहीही नाही या पर्यायाबद्दल अधिकृत पातळीवर प्रबोधन करण्यात यावे, अशी मागणी तुळजापूर येथील जागरूक मतदार रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे.

मतदारांना कोणताही उमेदवार योग्य वाटत नसल्यास मतदान यंत्रावरील NOTA बटण दाबून निषेध नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु या पर्यायाबाबत अजूनही अनेक मतदारांमध्ये अनभिज्ञता असल्याचे साळुंके यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

लोकशाही बळकट होण्यासाठी मतदारांनी माहितीपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. अनेकांना NOTA बद्दल स्पष्ट माहिती नसल्याने ते गोंधळात पडतात. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वृत्तपत्र, सामाजिक माध्यमे आणि इतर माध्यमांद्वारे तातडीने जनजागृती मोहीम राबवावी,अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

जनहित नगर, तुळजापूर येथील रहिवासी असलेल्या साळुंके यांनी दिलेल्या या निवेदनाला जागरूक नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून, निवडणूक आयोगाकडून योग्य ती दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

4/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे