Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा करारा दणका अवैध गावठी कट्टा जप्त; सराईत आरोपी अंधारात पसार

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची तुळजापुरात धडक कारवाई

0 7 6 4 8 7

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा करारा दणका अवैध गावठी कट्टा जप्त; सराईत आरोपी अंधारात पसार

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची तुळजापुरात धडक कारवाई

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर धाराशिव जिल्हा पोलिसांनी करारा प्रहार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी यासाठी सज्ज झालेल्या पोलीस दलाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर थेट कारवाई करत तुळजापूर येथे अवैध गावठी कट्टा जप्त केला. मात्र, सराईत व पाहिजे आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरला.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र व गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक गस्त घालत असताना तुळजापूर येथे गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.धाराशिव जिल्हा अभिलेखावरील पाहिजे आरोपी गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले (रा. कार्ला, ता. तुळजापूर) हा त्याच्या राहत्या घरी गावठी कट्ट्यासह असून चोरीच्या उद्देशाने बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजता तात्काळ छापा टाकण्यात आला.छाप्यावेळी आरोपी घरामागील चिंचेच्या झाडाखाली बसलेला आढळून आला. मात्र पोलिसांचे पथक दिसताच त्याने हातातील गावठी कट्टा फेकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून अवैध गावठी कट्टा जप्त केला.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८९/२५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त शस्त्र पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पसार आरोपीचा कसून शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या देखरेखीखाली व सपोनि सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. पथकात पोह/576 शौकत पठाण, पोह/289 जावेद काझी, पोह/929 प्रकाश औताडे, पोह/1275 फरहान पठाण, मपोह/1327 शोभा बांगर, चापोह/539 रत्नदीप डोंगरे यांचा समावेश होता.नववर्षाच्या तोंडावरच गुन्हेगारांना थेट इशारा देत, जिल्हा पोलीस प्रशासन गुन्हेगारीला मूठमाती देण्याच्या भूमिकेत ठाम असल्याचे या धडक कारवाईतून अधोरेखित झाले आहे.

🔹नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, गुन्हेगारी प्रवृत्ती व पाहिजे आरोपी यांच्याविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना थेट उत्तर दिले जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक गुन्हे शाखा अहोरात्र कार्यरत आहे.

— विनोद इज्जपवार,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे