ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती बैठक; वाहतूक व पार्किंगची विशेष व्यवस्था
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती बैठक; वाहतूक व पार्किंगची विशेष व्यवस्था

0
7
6
4
8
6
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती बैठक; वाहतूक व पार्किंगची विशेष व्यवस्था
धाराशिव : दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक नियंत्रण व पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आगामी सर्व बैठकींसाठीही हीच व्यवस्था लागू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री तसेच मान्यवरांचा ताफा, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट क्रमांक १ मधून प्रवेश देण्यात येणार असून, निर्धारित ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीसाठी निमंत्रित पदाधिकाऱ्यांची वाहने गेट क्रमांक २ मधून प्रवेश करून पार्किंगमध्ये उभी करण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागप्रमुख व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाहने जिल्हा परिषद, धाराशिव येथील गेट क्रमांक १ मधून प्रवेश करून तेथील पार्किंगमध्ये उभी राहतील.
दरम्यान, बैठकीसाठी येणारे पत्रकार व नागरिकांनी आपली वाहने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांनी या पार्किंग व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
0
7
6
4
8
6



