प्रभाग क्रमांक २ मध्ये ‘आनंदी आनंद’ महाविकास आघाडीकडून सौ.कोमल आनंद रोचकरी अधिकृत उमेदवार!
स्वच्छ चारित्र्य, मजबूत नेतृत्व – नव्या चेहऱ्यांना संधी!
प्रभाग क्रमांक २ मध्ये ‘आनंदी आनंद’ महाविकास आघाडीकडून सौ.कोमल आनंद रोचकरी अधिकृत उमेदवार!
स्वच्छ चारित्र्य, मजबूत नेतृत्व – नव्या चेहऱ्यांना संधी!
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक २ हाडको,विश्वानगर,आयोध्यानगर या महिला सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून सौ.कोमल आनंद रोचकरी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.“स्वच्छ चारित्र्य आणि मजबूत नेतृत्व” या घोषवाक्याखाली कोमलताई जनतेच्या आशीर्वादासाठी सज्ज झाल्या आहेत.

सौ.कोमल रोचकरी या समाजकारणात नव्या पण ऊर्जावान चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचे पती आनंद रोचकरी हे गेली १० ते १५ वर्षे प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे, जनतेसाठी नेहमीच कटिबद्ध कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि शैक्षणिक सुविधा अशा मूलभूत गरजांकडे त्यांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले असून, “रोचकरी” हे नाव आज नागरिकांमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले आहे.
यंदाच्या निवडणुकीत सौ. कोमल रोचकरी यांच्यावर पक्षाचाही आणि जनतेचाही दुहेरी विश्वास आहे.
“विकासाच्या वाटेवर तुळजापूर नेण्यासाठी नव्या विचारांचे नेतृत्व आवश्यक आहे,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. महिला उमेदवार म्हणून कोमलताईंच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रभागातील एकूण २४६३ मतदार नव्या चेहऱ्यांकडे आशेने पाहत आहेत.“स्वच्छ चारित्र्य, पारदर्शक कारभार आणि विकासाची नवी दिशा” हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे सौ. रोचकरी यांनी सांगितले. महाविकास आघाडीने दिलेल्या या संधीचं सोनं करून दाखवू, असा त्यांचा निर्धार आहे.
रोचकरी कुटुंबाच्या दीर्घकाळ सामाजिक कार्याचा पाया, महिलांचा विश्वास आणि युवा वर्गातील मजबूत संपर्क यामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये खरोखरच “आनंदी आनंद” दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीत या नव्या चेहऱ्याच्या माध्यमातून प्रभागात परिवर्तनाची नवी कहाणी लिहिली जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



