Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरमध्ये संशयास्पद मृत्यूची घटना; हनुमान नगरात खळबळ

तुळजापूरमध्ये संशयास्पद मृत्यूची घटना; हनुमान नगरात खळबळ

0 6 7 8 4 1

तुळजापूरमध्ये संशयास्पद मृत्यूची घटना; हनुमान नगरात खळबळ

तुळजापूर : शहरातील हनुमान नगर परिसरात कस्तुरा गणेश पवार (वय ४०, रा. हनुमान नगर, तुळजापूर) यांच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. कस्तुरा पवार या आपल्या आईसोबत राहत होत्या. मात्र मयत महिलेची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसांनंतर घरी परतल्यानंतर मुलगी घरात मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही घटना अपघाती आहे की घातपाताचा संशय आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.उपजिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, नातेवाईकांचे जबाबही नोंदवण्यात येत आहेत

▪️घटनेचे ठळक मुद्दे :

▪️हनुमान नगर परिसरात ४० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
▪️आई बाहेरगावी असताना घरात एकटीच होती महिला
▪️दोन दिवसांनंतर घरी आल्यानंतर मृतदेह आढळला
▪️घराला बाहेरून कडी; संशय अधिक बळावला

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पोलिस तपासातून पुढील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे