Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नळदुर्गात धक्कादायक प्रकार : तरुणीवर लैंगिक अत्याचार, धमकी देऊन शेतशेडमध्ये डांबले

नळदुर्गात धक्कादायक प्रकार : तरुणीवर लैंगिक अत्याचार, धमकी देऊन शेतशेडमध्ये डांबले

0 6 7 8 4 1

नळदुर्गात धक्कादायक प्रकार : तरुणीवर लैंगिक अत्याचार, धमकी देऊन शेतशेडमध्ये डांबले

नळदुर्ग : प्रतिनिधी

नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी (नाव व गाव गोपनीय) अंघोळ करत असतानाचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत गावातीलच एका तरुणाने तिला आपल्या शेतातील शेडमध्ये डांबून ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २५ नोव्हेंबर २०२५ ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली. आरोपी तरुणाने तिचे छायाचित्र काढल्याचे सांगून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि भीतीपोटी तिला शेतातील शेडमध्ये नेऊन कोंडून ठेवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणी पीडित तरुणीने दि. २९ जानेवारी २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यावरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 127(6), 351(3), 71 व 78 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे