ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
तुळजाभवानी महाविद्यालय विकास समितीवर धुरगुडे–लोंढे यांची निवड; महाविद्यालयात उत्साहात स्वागत-सत्कार
0
7
6
5
0
5
तुळजाभवानी महाविद्यालय विकास समितीवर धुरगुडे–लोंढे यांची निवड; महाविद्यालयात उत्साहात स्वागत-सत्कार

तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजाभवानी महाविद्यालयाच्या विकास समितीवर उद्योगपती व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. राजकुमार धुरगुडे तसेच मा. धनंजय लोंढे यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सत्कारसमारंभ संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. जीवन पवार होते. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत दोन्ही नवनियुक्त सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. श्री धुरगुडे यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा व महाविद्यालयाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली. ज्ञानासोबत विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा.धनंजय लोंढे यांनी सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम, कार्यक्रम आणि व्यवसायिक मार्गदर्शन राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी महाविद्यालयातील इतर नवनियुक्त सदस्य—मराठी विभागप्रमुख डॉ. बापुराव पवार, हिंदी विभागप्रमुख डॉ. मंत्री आडे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. बालाजी कऱ्हाडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वाती बैनवाड आणि कार्यालयीन विभागातील श्री. कालिदास आचार—यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोरे मॅडम यांनी केले. वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
7
6
5
0
5



