Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक रंगात! नगराध्यक्षपदाची शर्यत तापली… पण अर्ज मात्र “शून्य”

हुकमी एक्का कोण? तुळजापूरकरांच्या भुवया ताणल्या ?

0 7 6 4 8 7

तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक रंगात! नगराध्यक्षपदाची शर्यत तापली… पण अर्ज मात्र “शून्य”

हुकमी एक्का कोण? तुळजापूरकरांच्या भुवया ताणल्या ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस हातात उरलेत. १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस… पण अजूनपर्यंत नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही हीच शहरात सर्वाधिक चर्चेची बाब ठरली आहे.”वेट अँड वॉच”ची रणनीती अवलंबत राजकीय पक्षांनी शांतता राखली असून शहरातील सत्ताकारणाचा थरार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असून हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे मुख्य प्रश्न कायम-

“तुळजापूरचा पुढचा नगराध्यक्ष कोण?”

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून कोण “हुकमी एक्का”मैदानात उतरवणार याबाबत तुळजापूरकर उत्सुक आहेत. संभाव्य उमेदवारांची नावे फिरू लागली असून चर्चांना ऊतकूळी येऊ लागली आहे.अर्ज दाखल करण्याची केवळ ४८ तासांची मुदत उरली असताना पक्षांतर्गत ताण, पोषक समीकरणे आणि शेवटच्या क्षणाचे राजकीय कार्ड कोण उघडणार याकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत.राजकारण तापलंय… आता अर्जांच्या वाटा कुणी धरतो ते पाहणंच उत्सुकतेचं!

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;नामनिर्देशनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय,रविवारीही नामनिर्देशन दाखल करता येणार

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे