ब्रेकिंगमहाराष्ट्र
नूतन तुळजापूर न्यायालय परिसरात नव्या प्लॉटिंग प्रकल्पाचे उद्घाटन; वाढत्या शहराला दिलासा
नूतन तुळजापूर न्यायालय परिसरात नव्या प्लॉटिंग प्रकल्पाचे उद्घाटन; वाढत्या शहराला दिलासा

0
7
6
4
8
6
नूतन तुळजापूर न्यायालय परिसरात नव्या प्लॉटिंग प्रकल्पाचे उद्घाटन; वाढत्या शहराला दिलासा
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या पुण्यभूमीत, नूतन तुळजापूर न्यायालयाच्या परिसरात, शहरातील नळदुर्ग रोड भागात नव्या निवासी वसाहतीच्या प्लॉटिंग प्रकल्पाचे उद्घाटन युवा नेते तथा तुळजापूर पंचायत समिती सदस्य कृष्णा देवानंद रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना कृष्णा रोचकरी यांनी सांगितले की, तुळजापूर शहर झपाट्याने विस्तारत असून वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्यासाठी जागेची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नव्या प्लॉटिंग साईट्स उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष महेश चोपदार, बिल्डर रामभाऊ चोपदार, माजी सरपंच दिनकर पवार, कृष्णा चव्हाण, बालाजी कोकाटे, उद्योजक घाडगे, विनोद पवार, ओंकार काळे, वैभव चोपदार,शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.नव्या प्लॉटिंग प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना घरासाठी योग्य जागा उपलब्ध होणार असून शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0
7
6
4
8
6



