ब्रेकिंगमहाराष्ट्र
२३ फेब्रुवारीला भातंब्रीतील शेतरस्ता अखेर खुला होणार! तहसील प्रशासनाची नोटीस; पोलिस बंदोबस्तात कारवाई
२३ फेब्रुवारीला भातंब्रीतील शेतरस्ता अखेर खुला होणार! तहसील प्रशासनाची नोटीस; पोलिस बंदोबस्तात कारवाई

0
6
7
8
4
1
तुळजापूर : तालुक्यातील मौजे भातंब्री शिवारातील गट क्रमांक ५३ व ५५ कडे जाणारा शेतरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकलेला होता. सन २०२३ मध्येच तहसीलदारांनी आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात रस्ता खुला न झाल्याने प्रकरण चिघळले होते. अखेर तहसील कार्यालयाच्या जमा-२ विभागाने थेट नोटीस बजावत दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष जागेवर रस्ता खुला करण्याची ठोस घोषणा केली आहे.या प्रकरणात अर्जदार शिवाजी गोरोबा दांगट (रा. रायखेल) यांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करून पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसील प्रशासनाने संबंधित वादी-प्रतिवादींना नोटीस बजावून, सकाळी ११ वाजता कागदपत्रे व पुराव्यासह जागेवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.रस्ता खुला करताना कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुळजापूर पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भूमी अभिलेख विभाग, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनाही मूळ अभिलेख व मोजणी सहाय्यकांसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.अखेर वर्षानुवर्षे रखडलेल्या शेतरस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने हात घातल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, २३ फेब्रुवारीला प्रत्यक्षात रस्ता खुला होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0
6
7
8
4
1



