Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत-तहसीलदार हेमंत ढोकले !

विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत-तहसीलदार हेमंत ढोकले !

0 6 7 8 4 1

विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत-तहसीलदार हेमंत ढोकले !

कळंब : प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे दि.१० ऑक्टोबर २०२५ रोजी तहसीलदार हेमंत ढोकले आणि तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी अकस्मित भेट देऊन शाळेची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शालीय परिसर, स्वच्छता,पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांची उपस्थिती,गुणवत्ता तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तपासणी करून समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान तहसीलदार ढोकले यांनी शिक्षक,ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना ते म्हणाले, “मोबाईलपासून शक्य तितके दूर राहा. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि दैनंदिन अभ्यासात सातत्य ठेवा. आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. गुरुजनांचा सल्ला मनापासून ऐका, कारण तुम्हीच उद्याचे सक्षम आणि उज्ज्वल भारताचे नागरिक आहात.”

या प्रेरणादायी भेटीप्रसंगी तहसीलदार ढोकले यांचा शाळेच्या वतीने यथो चित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शिवव्याख्याते, उद्योजक व उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांनी केले. प्रस्ताविक सहशिक्षक तुकाराम कराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक बलभीम राऊत व शिवानंद स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. तहसीलदार ढोकले यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे