Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

महाराष्ट्राच्या बुलंद तोफेचा निनाद कधीच थांबणार नाही – ॲड विशाल प्रभाकर साखरे

महाराष्ट्राच्या बुलंद तोफेचा निनाद कधीच थांबणार नाही - ॲड विशाल प्रभाकर साखरे

0 7 6 4 9 7

महाराष्ट्राच्या बुलंद तोफेचा निनाद कधीच थांबणार नाही – ॲड विशाल प्रभाकर साखरे

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या आवाजाने सभागृह हादरायचे, विरोधक गारद व्हायचे आणि कार्यकर्त्यांच्या अंगात नवी ऊर्जा संचारायची, असे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. “बुलंद तोफ” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा हे केवळ नेता नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, आधार आणि प्रेरणा होते.दि.२८ जानेवारी २०२६ ची सकाळ उजाडली तीच मन हेलावून टाकणारी बातमी घेऊन.एका क्षणात संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झाला. अजितदादांचे अचानक जाणे हे आम्हा कार्यकर्त्यांसाठी पोरके करणारे आहे. त्यांच्या परखड बोलण्यामागे असलेली प्रामाणिकता,मिश्किल वक्तव्यांतून उमटणारी माणुसकी आणि निर्णयांमधील निर्भीडपणा हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. प्रश्नावर दबदबा असो वा परिस्थितीवर नियंत्रण – अजितदादा नेहमीच पुढे उभे राहिले.कार्यकर्त्यांवर कधी खडे बोल, तर कधी पाठीवर थाप देणारे प्रेम – हा त्यांचा स्वभाव आम्हाला घडवत गेला. प्रत्येक भाषणातून त्यांनी विचार दिले, दिशा दिली आणि संघर्षाची ताकद दिली. आज ते आमच्यात नाहीत, ही जाणीव हृदयात असंख्य वेदना निर्माण करते; पण त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श कधीच संपणारे नाहीत.अजितदादा हे केवळ एका पदाचे नाव नव्हते, ते एक चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांची कार्यशैली, शिस्त आणि निर्णयक्षमता हे राजकीय क्षेत्रातील आदर्श उदाहरण आहे.ते गेले असले तरी त्यांचे विचार अमर आहेत.एकच वादा – अजितदादा कधीच आमच्या मनातून दूर जाणार नाहीत.महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा निनाद सदैव घुमत राहील.💐🙏

 

शोकाकुल :
▪️ॲड. विशाल प्रभाकर साखरे जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव.

▪️ॲड. मंजुषा विशाल साखरे
Sakhare And Legal Association.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे