Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रंथभेटीतून शिवजयंतीचा संदेश हालहळ्ळीतील स्वा. सावरकर सार्वजनिक वाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम

ग्रंथभेटीतून शिवजयंतीचा संदेश हालहळ्ळीतील स्वा. सावरकर सार्वजनिक वाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम

0 7 6 4 9 7

अक्कलकोट : तालुक्यातील हालहळ्ळी (अ.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्ती, वाचनसंस्कृती आणि इतिहासाची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेविका सरवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश बिराजदार होते. यावेळी पोलीस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत निरंतर वाचन केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आपल्या बोलीभाषेत अभिप्राय लिहून तो मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारीपर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नदाफ, शेख व विद्यार्थी उपस्थित होते. शेख यांनी शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासा विषयी अभिमान जागवला. कार्यक्रमाच्या शेवटी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे