ब्रेकिंगमहाराष्ट्र
“तुळजाई मॅरेथॉन”नोंदणीचा उत्स्फूर्त प्रारंभ; विठाई हॉस्पिटलच्या माध्यमातून तुळजापूरात फिटनेसची नवी चळवळ पहिल्याच दिवशी ५१ स्पर्धकांची नोंद
विठाई हॉस्पिटलच्या आरोग्य संदेशाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

0
6
7
8
4
1
तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने आणि विठाई हॉस्पिटल प्रस्तुत आयोजित करण्यात येणाऱ्या “तुळजाई मॅरेथॉन” स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी दि.१९ फेब्रुवारी उत्साहात झाला. सकाळी ११ वाजता आमदार राणाजगजितसिंह पाटील व प्रभारि नगराध्यक्ष रामचंद्र रोजकरी यांच्या शुभहस्ते नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.या वेळी रोटरी क्लब तुळजापूरचे ज्येष्ठ व मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास रो. अप्पासाहेब पाटील,रो.राहुल तागड,रो.अमर हंगरगेकर,रो.सुधीर शेळके,रो. अमोल गुंड,रो.भारत जाधव,रो. अनिल रोचकरी,रो.प्रशांत अपराध,रो.सुरेश कदम,रो.संजय मैंदर्गी,रो.बालाजी ढोबळे,रो. पुष्पराज रोकडे,रो.शरद जगदाळे, रो.रोहित चव्हाण,रो.परिचय जाधव यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत पहिल्याच दिवशी तब्बल ५१ स्पर्धकांनी नोंदणी पूर्ण केली, ही बाब आयोजकांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. “तुळजाई मॅरेथॉन” हा उपक्रम आरोग्यजागृती,फिटनेस आणि सामाजिक एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असून, या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी ठरेल,असा विश्वास रोटरी क्लब तुळजापूरने व्यक्त केला आहे.

0
6
7
8
4
1



