Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अन्नदानातून ५०० कुटुंबांची दीपावली गोड — जनविश्वास बँकेचा उपक्रम

0 7 6 4 8 6

अन्नदानातून ५०० कुटुंबांची दीपावली गोड — जनविश्वास बँकेचा उपक्रम

भूम : प्रतिनिधी

“अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून जनविश्वास बँकेचे चेअरमन संतोष सुरेश वीर यांनी आपल्या वडिलांची समाजसेवेची परंपरा यंदाही पुढे चालवत ५०० गरजू कुटुंबांची दीपावली गोड केली आहे. मागील चार वर्षांपासून जनविश्वास को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करून दीपावलीचा आनंद वाटण्यात येतो आहे.

या वर्षी अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जनविश्वास समूहाने सामाजिक बांधिलकी जपत “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या उपक्रमांतर्गत ५०० कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटप केले. हा उपक्रम शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी जनविश्वास बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडला.

या प्रसंगी सहाय्यक निबंधक सुनिता ढोकळे, सहाय्यक सहकार अधिकारी के. जी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.

यावेळी चेअरमन संतोष वीर म्हणाले, “हे कार्य आम्ही दरवर्षी अधिक जोमाने करतो. या कार्यामागे जनविश्वास बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार व व्यापारी वर्ग यांचा सहकाररूपी आशीर्वाद लाभत आहे. ठेवीदारांचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे. पारदर्शक व प्रामाणिक व्यवहार करणे, हेच आमचे ब्रीद आहे आणि ते पुढेही कायम ठेवू.”

या कार्यक्रमाला रवी लोंढे, आकाश शेंडगे, सोमनाथ टकले, सुजित जिकरे, कल्पेश राऊत, उमेश काळे, सचिन माळी, विवेक जोगदंड, रणजीत वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जनविश्वास बँक सामाजिक बांधिलकी जपत सहकाराच्या सेवाभावाची परंपरा सातत्याने जिवंत ठेवत आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे