Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

गाडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी;बावी पाटी परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांचा प्रकार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 7 6 4 8 6

गाडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी;बावी पाटी परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघांचा प्रकार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या गाडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बावी पाटी परिसरात घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी अशोक अर्जुन खरात (वय ५१, रा. विजयपुर, कर्नाटक) हे टाटा नेक्सॉन (क्र. केए २८ एमए २००६) गाडीने दि. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, बावी येथील आश्रमशाळेजवळील पुलानंतर त्यांनी रोडच्या कडेला गाडी थांबवून नैसर्गिक विधीसाठी खाली उतरले. गाडीचा दरवाजा उघडाच ठेवण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत तिघा अज्ञात व्यक्तींनी गाडीत प्रवेश करून त्यातील ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेला.

घटनेनंतर खरात यांनी धाराशिव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी (चोरी) गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून चोरट्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे