Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

“फूस लावून पळविल्याचा आरोप खोटा”; महिलेचा पोलिसांकडे खुलासा, बदनामीविरोधात कारवाईची मागणी

“फूस लावून पळविल्याचा आरोप खोटा”; महिलेचा पोलिसांकडे खुलासा, बदनामीविरोधात कारवाईची मागणी

0 7 6 4 8 6

“फूस लावून पळविल्याचा आरोप खोटा”; महिलेचा पोलिसांकडे खुलासा, बदनामीविरोधात कारवाईची मागणी

तुळजापूर : “माझे व संबंधित तुळजापूर येथे कार्यरत असलेले केदार वाघुलकर पोलीस कर्मचाऱ्याचे नाते मामा-भाचीचे असून आमच्यात कोणतेही अनैतिक संबंध नाहीत. माझ्या पतीने केलेले सर्व आरोप खोटे व बदनामीकारक आहेत,”असा खुलासा एका विवाहित महिलेने पोलीस निरीक्षक, तुळजापूर पोलीस ठाणे येथे दिलेल्या निवेदनात केला आहे.दि. २७ मार्च २०२६ रोजी महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे अर्ज देत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर महिलेला फूस लावून पळविल्याचा आरोप केला होता. तसेच दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र हे सर्व आरोप निराधार असल्याचे महिलेने स्पष्ट केले आहे.महिलेने निवेदनात म्हटले आहे की, ती गेल्या अनेक वर्षांपासून डोक्याच्या आजाराने त्रस्त असून त्रास वाढल्याने दि. १९ मार्च रोजी ती स्वतःच्या इच्छेने दोन मुलींना सोबत घेऊन एसटी बसने आई-वडिलांकडे गेली. त्यानंतर सास्तूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत दि. २० मार्च रोजी तिच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले.ऑपरेशननंतर ती आई-वडिलांसोबत त्यांच्या गावी राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुलींचे शिक्षण नियमित सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचारी केदार वाघुलकर हा नात्याने मामा असून त्याच्याशी कोणताही अनैतिक संबंध नसल्याचे महिलेने ठामपणे सांगितले आहे.न्यायालयीन प्रकरणाची नोटीस मिळाल्यानंतर पतीने रागातून खोटा अर्ज करून बदनामी केल्याचा आरोपही महिलेने केला असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे